महावितरणचा लाचखोर अभियंता जळगाव एसीबी च्या जाळ्यात, ४५०० रुपयांची लाच घेताना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ममहावितरणचाहा वितरण अभियंता अमित दिलीप सुलक्षणे, वय ३५ वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा यांना ४५०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव च्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांच्या घरी नवीन विज मिटर बसवून देण्या करीता अमित दिलीप सुलक्षणे , वय ३५ वर्षे,व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा शहर कक्ष २ , यांनी ५५०० /- रूपये लाचेची मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दि ११/३/२०२५ रोजी ल. प्. वि. जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता अभियंता अमित सुलक्षणे यांनी तक्रारदार यांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी करून सदर लाच रक्कम आज दि. १२/३ /२५ रोजी स्विकारतांना अमित दिलीप सुलक्षणे , वय ३५ वर्षे, व्यवसाय – सहायक अभियंता म.रा.वि.वि.क. मर्यादित चोपडा शहर कक्ष २ , रा.प्लॉट.नं. ६० -बोरोले १ चोपडा जि.जळगाव (वर्ग -२). यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द चोपडा शहर पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पो. उप अधीक्षक जळगाव विभाग. सापळा व तपासी अधिकारी
श्रीमती नेत्रा जाधव पोलीस निरीक्षक , लाप्रवि,जळगाव. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पो ना/मराठे, पो ना/राकेश दुसाने यांनी केली.