महिलेची निर्घृण हत्या, जळगाव मध्ये खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी असून त्यांच्या पत्नी सुवर्णा राजेश नवाल. वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव. या महिलेची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली.
दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये देण्यात आला आहे. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.