चाकूने वार करून महिलेचा निर्घृण खून, घटनेने परिसर हादरला
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यातील भुसावळ येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे सोनाली महेंद्र कोळी या महिलेचा चाकूने पाठीवर व पोटात वार करून निर्घृण खून केल्याची घटना २५ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली.
या खळबळजनक घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे राहात असलेल्या सोनाली महेंद्र कोळी या महिलेचे बुधवार रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास साकेगावातच राहणारा सागर रमेश कोळी. वय २८ वर्ष. याच्या सोबत भांडण झाले या भांडणात सागर कोळी याने त्याच्या हातात असलेल्या चाकूने सोनाली कोळी या महिलेच्या पोटावर व पाठीवर सपासप वार केले. या दोघांचे भांडण सुरू असताना विनोद सुभाष कुंभार .वय – २८ वर्ष. हा तरुण भांडण सोडवण्यासाठी आला असता. त्याच्या हातावर देखील वार करून “आमच्या मधात येऊ नकोस नाहीतर तुला ठार मारून टाकेल” असा त्यालाही दम दिला.या भांडणात सागर कोळी याने चाकूने वार केल्याने सोनाली कोळी या महिलेचा त्यात खून झाला. या घटनेने साकेगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड पथकासह दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे पाठविण्यात आला असून रात्री उशिरा सागर रमेश कोळी. वय-२८ वर्ष राहणार साकेगाव,तालुका – भुसावळ
यांचेवर भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.