राज्यातही उत्तरप्रदेश प्रमाणे बुलडोझर पॅटर्न, अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आता महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश प्रमाणे बुडोझर पॅटर्न सुरू करण्यात आला असून
अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना देले आहेत.तसेच अंमली पदार्थ तस्करांवर नव्याने कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत.
ज्या ठिकाणी अनधिकृत पब ,बार असतील त्यांचेवर बुलडोझर फिरवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.