पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवल्याची तक्रार करणार , नेमकं कारण काय तक्रारीचं ?
बुलढाणा ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मंत्री गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. काल संध्याकाळी बुलढाणा जिल्ह्यात काल सायंकाळी संग्रामपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा अवकाली पाऊस झाल आहे. या अवकाळी पावसानं घातलेल्या थैमानामुळे अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. संग्रामपूर येथील अनेक नागरिकांच्या घराची छपरे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडाली असून अनेकांचा संसार उघड्यावर पडला आहेत.
जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे आणि अवकाळी पावसामुळे जवळपास ६० ते ७० परिवार हे बेघर झालेले आहेत. तरीही या ठिकाणी प्रशासन किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी न पोहोचल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कुठे गायब झालेले आहेत , आणि त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे, अशी टीका करत रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत. अशावेळी नागरिकांना मदत करण्याचं सोडून पालकमंत्री हे जिल्ह्यात फिरकतच नाही, अशी टीकाही रविकांत तुपकर यांनी केली आहे.