शेतकरी सन्मान करत “जाणिव” ने केला अमृत महोत्सव साजरा
नांदुरा,जि. बुलढाणा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्ष झाले. भारत हा कृषिप्रधान देश आहे. सीमेवर लढणारे जवान आणि शेतात राबणारे किसान यांच्यामुळे खरं तर आपण सुखी आणि सुरक्षित जीवन जगू, कळत नकळत कुठेतरी आज शेतकऱ्यांवर अन्याय होतो जाणीव च्या वतीने एक छोटासा प्रयत्न म्हणून तर ‘शेतकरी सन्मान’ हा उपक्रम घेतला जातो. अन्नदात्यावरची आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा योग्य पर्याय आहे.
जिल्हा बुलढाणा तालुका नांदुरा ग्राम महाळूंगी येथील रामचंद्र प्रल्हाद डिवरे ताईबाई रामचंद्र डिवरे या शेतकरी कुटुंबाचा शेला टोपी श्रीफळ १००१/- रुपयांचा धनादेश देऊन सन्मान केला गेला. जाणीव चे सदस्य स्वतः त्यांचे शेतात गेले. संपूर्ण माहिती घेतली.चर्चा झाली. शेतकरी जीवन कसे असते हे जवळून पाहायला मिळाले. एक वेगळा आनंद समाधान यातून जाणीव सदस्यांना मिळत असल्याचे प्रांजली धोरण यांनी यावेळी सांगितले. आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांना आपण भेटून असा सन्मान केल्याने त्यांचे मनोबल वाढेल आणि मुळातच खंबीर असलेल्या या दादांकडून आपल्यालाही काही शिकायला मिळेल असा दुहेरी उद्देश या सन्मानामध्ये असतो. शेतकरी हाच खरा अन्नदाता असल्यामुळे त्यांना काही देण्या इतपत आपण मोठे नक्कीच नाही परंतु आपण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो.
जाणिव ने सुरू केलेल्या या उपक्रमात आपणही सहभाग घेऊन योगदान देऊ शकता असे यावेळी सतिश भिसे पाटील यांनी आवाहन केले.या उपक्रमासाठी जाणिव सदस्य सचिन ढोन, प्रदीप चंदनशिवे, अनिरुद्ध घोंगटे, मयूर पस्तापुरे, स्वप्नील वाघमारे, रोशन तायडे,सुधाकर पाटील,नितीन बावस्कर, दिलीप पाटील* यांचा सहभाग होता. यावेळी नारायण डिवरे,सतिश भिसे पाटील,सचिन ढोन,सचिव मनोज यादव,प्रांजली धोरण उपस्थित होते.
जय जवान जय किसान चा नारा देत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावेळी साजरा करण्यात आला.