महाराष्ट्र

बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी लागू; शाळा महाविद्यालय बंद

मंडे टू मंडे वृत्तसंकलन :

बुलडाणा (प्रतिनिधी): बुलडाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. याचे कारण म्हणजे आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. आजच्या आदेशाने शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभाला 50 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे…

अकोला जिल्हाधिकारी यांनी 15 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बुलडाणा, एस. रामामुर्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, शासन आदेश दिनांक 29/01/2021 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) मधील तरतुदीनुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून बुलडाणा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी लागू केली आहे. आता बुलडाण्यात संचारबंदी लागू झाल्याने शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!