कत्तली साठी निर्दयीपणे वाहतूक करणारा गुरांचा ट्रक पकडला, ३२ गुरांची सुटका
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मध्यप्रदेश – महाराष्ट्र सीमेवर कत्तली साठी निर्दयीपणे वाहतूक करणारा गुरांचा ट्रक शेरी नाक्यावर बॅरिकेट्स तोडून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक ला सहस्रालिंग जवळ सिनेस्टाईल पकडण्यात आला. या ट्रक मधून ३२ गुरांची सुटका करण्यात आली.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मध्यप्रदेश – महाराष्ट्र सीमेवर शेरिनाका तपासणी साठी सुरू करण्यात आला असून येथून एम.पी. ३७ जी .ए.३३४२ क्रमांकाची ट्रक नाक्यावरील
बॅरिकेट्स तोडून पाल गावाच्या रस्त्याने भरघाव वेनाने पाल कडे आला, पाल मध्ये या ट्रकने एका व्हिस्टा गाडीला कट करून गाडीचे नुकसान केले. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून या गाडीला सहस्रालींग जवळ पकडला या गाडीची तपासणी केली असता त्यांना या गाडीत ३७ गुरे कत्तली साठी निर्दयीपणे वाहतूक करून नेत असल्याचे स्पस्ट झाले.यात निर्दयीपणे कोंबलेले असल्याने ५ गोऱ्ह्यांचां ट्रक मध्येच मृत्यू झालेला आढळला.
पोलिसांनी जिवंत गुरांची सुटका करून त्यांना आर सी बाफना गो शाळेत पाठवण्यात आले.या बाबत रावेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पूढील तपास डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक सचिन नवले हे तपास करीत आहेत.