भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनरावेरसामाजिक

निंभोरा येथे शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन

निंभोरा, ता . रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक या.रावेर येथे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना , राष्ट्रीय विधवा व दिव्यांग योजना या केंद्र व राज्य शासनाच्या लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे डीबीटी कामी आधार व्हॅलीडेशन चे काम रावेर तहसील कार्यालय येथे सुरू असून याकरिता लाभार्थ्यांना रावेर तहसील कार्यालयात यावे लागते लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचावा याउद्देशाने उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे फैजपूर भाग फैजपूर व तहसीलदार बंडू कापसे रावेर यांचे मार्गदर्शनानुसार याबाबत तालुक्यातील विविध ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

निंभोरा मंडळ अधिकारी रविंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा येथे दि. १९ मे सोमवार रोजी सकाळी ०८ ते ११ यावेळेत कृषीतंत्र विद्यालय निंभोरा बु. ता.रावेर येथे या शिबीराचे आयोजन केले आहे तरी निंभोरा सह परीसरातील ,दसनूर, आंदलवाडी, सिंगनूर, मस्कावद बु.,मस्कावद खुर्द, मस्कावद सीम या गावांतील लाभार्थींनी या शिबीराला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन निंभोरा मंडळ अधिकारी रविंद्र वानखेडे, निंभोरा ग्राम महसूल अधिकारी दुर्गेश भालेराव, प्रशांत जाधव, समीर तडवी, नितीन कोचूरे महसूल सेवक महेंद्र चौधरी, सचिन कोळी, महसूल सहकारी जगजीवन मोरे, भुवन बोरोले यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी शिबीरास येताना अपडेट केलेले आधार कार्ड, बँक पासबुक व आपल्या आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल (सांकेतांक घेणेकामी) न विसरता सोबत आणने गरजेचे आहे.
निंभोरा महसूल मंडळ अधिकारी रविंद्र वानखेडे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!