भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

अवैध गौणखनिज वाहून नेणाऱ्या डंपरने चिरडल्याने एकाचा मृत्यू

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l नदी पात्रातून गाळ घेऊन मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने आज नदी पात्राच्या जवळच एका व्यक्तीला चिरडले. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील पुर्णा नदीपात्रातून गाळ वाहून नेणार्‍या डंपरने एकाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडली. खामखेडा येथील पुर्णा नदीच्या पात्रातून शेकडो ट्रॅक्टर, डंफर, टिप्पर ,हायवा यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गाळाचा उपसा केला जात आहे. यातील काही डंपर मालकांकडे गौण खनिज उपशाची परवानगी असली तरी बहुतांश डंपर्स रात्रंदिवस २४ तास हे अवैध प्रकारात गाळ उपसा करून तो व्यावसायिक प्रयोजनाकरिता वीटभट्टी मालक अथवा शेतकर्‍यांना विकत आहेत. शेती प्रयोजनासाठी हा गाळ वापरण्यात यायला पाहिजे. परंतु हा गाळ व्यावसायिकतेचा दृष्टीकोनातून विक्री केला जात आहे.

याबाबत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्याकडे सदर अवैध उत्खनन थांबवण्याबाबत तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज माफियांचा हस्तक असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यावर सदर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर कोणतेही कारवाई करण्यात येत नाही.यामुळे या नदीच्या पात्रात अनेक डंपर्सची सातत्याने ये-जा सुरू असते.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल होत मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. या दुर्घटनेतून अवैध गौणखनिज वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला असून हा “हस्तक” कोण? हा चर्चेचा विषय बनला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!