मुक्ताईनगरात शिवीगाळ करून मारहाण करण्याऱ्या युवकांवर गुन्हा दाखल !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात मनोरुग्ण इसम व त्याच्या आईस मारहाण करणाऱ्या टोळक्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 9 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास चंद्रकांत भगवान पाटील हा मनोरुग्ण ईसम त्याच्या आईसोबत रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये जात असताना प्रवर्तन चौकात काही युवकांनी रुग्णवाहिकेतून काढून जबर मारहाण केली होती त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते
काल विजया भगवान पाटील राहणार सालबर्डी यांच्या फिर्यादीवरून लक्की उर्फ बाबा गाढे, सचिन बोदडे, उदय भगवान बोदडे, सिद्धार्थ उर्फ दाऊद तायडे, संजय तायडे प्रवीण बोदडे, गोलू बोदडे व इतर दहा ते पंधरा लोकांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्थानकात महाराष्ट्र दंड संहिता 1860 अन्वये कलम 324, 341,141, 143,147, 149,504, 506 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (37(1) (C) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ करीत आहे