भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये पोलिस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पहिले लग्न झालेले असताना घटस्फोट न घेता घटस्पोट झाल्याचे भासवून भुसावळ शहरातील एका २९ वर्षीय महिलेशी लग्न करून तिची फसवणूक केली. इतकेच नव्हे तर लग्न झाल्यानंतर झालेल्या मुलाला दत्तक देण्या साठी जबरदस्ती करून लग्न केलेल्या महीलेचे दागिने हडप करून तिचा छळ केला. या प्रकरणात एका पोलिस उपनिरीक्षकासह ७ जणांवर भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या पिडीत महिलेचा २०१५ मध्ये पहिला विवाह झाला होता.या नंतर जवळ जवळ ५ वर्षा नंतर सन २०२० मध्ये काही कारणास्तव त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्या नंतर २०२२ मध्ये सचिन सौंदाणे यांचे मध्यस्थीने त्यांचा विवाह शरद सौंदाणे यांच्या सोबत करण्यात आला.लली जि.जळगाव. ल ल ज सौंदाणेसौंदाणे लग्न झाल्या नंतर २०२३ मध्ये पिडीत महिलेला मुलगा झाला.

शरद सौंदाणे याने पहिल्या पत्नी पासून घटस्फोट झालेला नसताना देखील घटस्फोट झाल्याचे दाखवून दुसऱ्या महिलेशी लग्न करून पिडीत महिलेची फसवणूक केली.व दुसऱ्या पत्नी पासून झालेल्या मुलाला आशा सौंदाणे या महिलेला दत्तक देण्यासाठी महिलेवर जबरजस्ती करत तिच्यावर दबाव आणून तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिला शिवीगाळ करत मारहाण केली. व तिला तिच्या माहेरी सोडून देत तीची फसवणूक केली.

या संदर्भात पिडीत महिलेने शरद छगन सौंदाणे, आशा हर्षल सौंदाणे, सर्व राहणार नांदेड,ता. धरणगाव, जि.जळगाव. सुनील सोनवणे,रेखा सुनील सोनवणे, मयूर सुनील सोनवणे,सर्व रा.जामनेर व सचिन सौंदाणे. रा.नांदेड ता. धरणगाव, ह.मू. पुणे .यांनी छळ केल्याची तक्रार केली असून यातील मुख्य आरोपी हा गोंदिया येथील पोलिस उप निरीक्षक आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली संजय तायडे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!