भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

३० हजारांच्या लाच प्रकरणी महसूल सहाय्यकावर गुन्हा दाखल

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पक्षकाराच्या बाजूने निकाल लावून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखविणाऱ्या नाशिक विभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी कैलास पाराजी वैरागे यांचेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे व्यवसायाने वकील असुन त्यांचे पक्षकार यांनी मा. विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात सहाय्यक महसूल अधिकारी कैलास पाराजी वैरागे यांनी वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. म्हणून कैलास पाराजी वैरागे, वय ५१ वर्ष, महसूल सहाय्यक, (वर्ग ३ ) नेमणूक – विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रा. शिवदर्शन सोसायटी फ्लॅट नंबर १, नाशिक रोड कोर्टाच्या मागे, नाशिक रोड, नाशिक. यांचे विरुध्द नासिक रोड पोलीस स्टेशन, नाशिक शहर, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक, सापळा पथक, पोहवा / दीपक पवार
पोहवा/ संदीप हांडगे, पोशी/ संजय ठाकरे, चालक पोहवा/विनोद पवार यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!