रोखठोक नितीन गडकरी ; घराणेशाहीतून असलेल्या उमेदवारांना मतदान करू नाका..
नागपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राजकीय वर्तुळात घराणेशाहीवरून अनेकदा राजकारण अनेक वाद होताना दिसून येतात. मी नाही तर माझ्या मुलाला तिकीट द्या, किंवा मी पुढच्या निवडणुकीला उभा राहणार नाही, म्हणून आता माझ्या मुलाला मतदान करा. अशी घराणे शही बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळतात. अशी अनेक उदाहरणे ही समोर आहेत. आणि अशातच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना राजकारणातील घराणेशाही वर रोखठोक भाष्य केले आहे. जनतेने अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नितीन गडकरी म्हणाले, आपण कायम आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच आपण म्हणतो, विश्वाचं कल्याण होवो, आपल्या संस्कृतीत असं कुठेच म्हटलं नाही, माझं कल्याण होवो, माझ्या पोरांचं कल्याण होवो, मग माझ्या दोस्तांचं कल्याण होवो, हा पण राजकारणात असं काही लोक म्हणातात. माझ्या पोराचं पहिले कल्याण करा असं काही लोक म्हणतात, असं म्हणत नितीन गडकरी यांनी घराणेशाहीला टोला लगावला आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, ‘माझ्या मुलांचं कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झालं तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालतं? तर लोक त्यांना मत देतात, ज्या दिवशी लोक ठरवतील. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत. त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते एका मिनीटात सरळ झाल्याशिवाय राहात नाहीत. कारण कोणाचं मुलगा, मुलगी राहणं हे, पुण्यही नाही आणि पापही नाही. त्यांनी आपली क्षमता दाखवली पाहिजे, त्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे, तुमच्या मुलाला उभं करा’, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. नागपुर मधील आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात काल नितीन गडकरी यांनी हे रोखठोक वक्तव्य केले.
काय म्हणाले नितीन गडकरी — घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही. तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही.. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे. या रोखठोक वक्तव्याने घरणेशाहीतून निवडणुकीत उभे राहणाऱ्या राजकीय नेत्यांच्या व वारसांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.