निर्दयीपणे कोंबून गुरांची तस्करी करणारा पुन्हा कंटेनर पकडला, रावेर पोलिसांची आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |अत्यंत निर्दयीपणे आणि तेवढ्याच निर्भयतेने प्राणी वाहतुकीचा कुठलाही परवाना नसताना दाटीदाटीने कोंबून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या रावेर खरगोन रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळून विनापरवाना पारडूची वाहतूक कारणारे कंटेनरवर रावेर पोलीसांनी कारवाई करत ५१ पारडूची सुटका केली. या आठवड्यातील रावेर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.
मिळालेल्या अधिक माहिती नुसार, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या आणि रावेर खरगोन रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळून एका कंटेनरमधून पारडूंची कोंबून वाहतूक होत असल्याची माहिती रावेर पोलीसाना मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत कंटेनर क्रमांक KN ०१ AN ५०२८ ची तपासणी केली असता यात ५१ पारडूंना निर्दयीपणे बांधून कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी हा कंटेनर जप्त केला असून जप्त करण्यात आलेला कंटेनर राजस्थानहून केरळकडे जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत एका संशयितला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.या सर्व पारडूंना गौशाळेत पाठवण्यात आले आहे.