“सीबीआय मला केव्हाही अटक करणार” माजी गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव प्रकरणात सीबीआय मला केव्हाही अटक करणार” असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ”गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याशी संबंधीत प्रकरणात सीबीआय आपल्याला केव्हाही अटक करू शकते !” असे वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यासाठी कथित दबाव टाकल्याचे प्रकरण अलीकडच्या काळात ऐरणीवर आले आहे. या प्रकरणी शरद पवार व एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव पोलिसांवर दबाव टाकल्या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.या संदर्भात अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलतांना आपल्याला जळगाव प्रकरणी सीबीआय कोणत्याही क्षणी अटक करू शकते, तसेच सीबीआय आपल्याला अटक करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गौप्यस्फोट देखील असे विधान केल्याने चर्चेला उधाण आले आहे. ते पुढे म्हणाले की, सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नसतांना देखील हा गुन्हा चुकीच्या पध्दतीत दाखल करण्यात आला आहे. सीबीआय आपल्याला केव्हाही अटक करू शकते. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी या संदर्भात केला.