भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

“मातोश्री” फाऊंडेशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज दिनांक २९ .९.२०२४ रविवार रोजी मातोश्री फाऊंडेशन चा नववा वर्धापन दिन पिंपरूड येथे उत्साहात साजरा झाला, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे फोटोला पाहुणे श्री बा प्रे महाजन, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, पत्रकार प्रा संदीप चौधरी हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली, त्यानंतर पाहुण्यांचा तसेच पत्रकार सर्वश्री संजय सराफ, सलीम पिंजारी, भानुदास भारंबे, इदू पिंजारी, यांचा तसेच श्रीमती रईसा तडवी पोलीस पाटील जानोरी यांचेही यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. नुकतेच कॉमर्समध्ये डॉक्टरेट झालेल्या प्रा डॉ सपना कांती जंगले यांचा सत्कार करण्यात आला,  या वेळी मातोश्री फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले यांनी प्रास्ताविक केले.

 गणपती पूर्वी मातोश्री फाऊंडेशन तर्फे पर्यावरण पूरक शाडू चे गणपती मुर्ती बनविण्याची स्पर्धा खंडेराव देवस्थान फैजपूर येथे आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान पत्र व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला, तर गांधी विचार संस्कार परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थांना गांधीजींचे विचार प्रवर्तक पुस्तके वाटप करण्यात आले, दिवाळी नंतर आपापल्या शाळेत परीक्षा घेण्यात येणार आहे,ज्या विद्यार्थ्यांना अजुनही परीक्षेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांचे रेशन कार्ड झेरॉक्स, नाव व इयत्ता जिप शाळा पिंपरूड चे मुख्याध्यापक श्री सलीम तडवी यांचेकडे पाच ऑक्टोबर पर्यंत द्यावेत, त्यानंतर मोफत पुस्तके मिळतील. असे आवाहन मातोश्री फाऊंडेशन ने केले आहे.


कु.जान्हवी जंगले ही डी एन कॉलेजची विद्यार्थीनी कु. जान्हवी जंगले हिची इंटरकॉलेज टेबलटेनिस स्पर्धेत प्रतिनिधी खेळाडू म्हणून निवड झाली त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. मातोश्री फाऊंडेशन तर्फे मेंदूचे शस्त्रक्रियेसाठी जळगाव येथे ऍडमिट असलेल्या निखिल तुकाराम कोळी याला पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला, तर समाजातील मान्यवरांनी निखिल ला यथाशक्ती मदत करावी असे आवाहन मातोश्री फाऊंडेशन ने केलें.


 त्यानंतर कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींचे विचार सोप्या भाषेत समजावले, प्रमुख पाहुणे श्री बा प्रे महाजन यांनी मार्गदर्शन केले तर शालीनी चौधरी यांनी सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री बाळकृष्ण खडसे,चंद्रकांत जंगले, रोहित गुजराती,व्ही ओ चौधरी सर, सलीम तडवी,युवराज लोधी सर, यशवंत वारके , सुनिल जंगले,विजय जंगले यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!