भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हा सांख्यिकी कार्यालय,जळगाव तर्फे ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव तर्फे दि. 29 जून,2024 रोजी सकाळी 11:00 वा. ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला. प्राध्यापक (दिवंगत) प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, भारत सरकारने दरवर्षी 29 जून हा दिवस त्यांच्या जयंती निमित्त “सांख्यिकी दिन” म्हणून विशेष श्रेणीमध्ये नियुक्त केला आहे.

सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी विशेषत: तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे. सदर कार्यक्रमासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ येथील संख्याशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक श्री. मनोज पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे श्री. राहुल इधे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी हे होते.

श्री.राजेंद्र पु. बोरसे, कार्यक्रमाचे संयोजक तथा उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जळगाव यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सांख्यिकी दिनासाठी यावर्षी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांचेकडुन “Use of Data for Decision Making” ही संकल्पना (Theme) निश्चित करण्यात आली होती त्याबाबत श्री.राजेंद्र पु. बोरसे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे सांख्यिकी सहायक श्री. प्रकाश तोमर यांनी सुत्रसंचालन केले. श्री. वैभव लोढे, श्री. हर्षल चौधरी, श्री. भैरवसिंग पाटील व सांख्यिकी अन्वेषक श्री. हेमंत गायकवाड व श्री. नितिन चौखंडे अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. श्री. समीर भालेराव, सहायक संशोधन अधिकारी यांनी आभारप्रदर्शन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!