आताची मोठी बातमी : पराभूत उमेदवारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची नवी योजना
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l या वर्षा पासून केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांसाठी एक नवी योजना तयार केली आहे. या वर्षी निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना ई व्हि एम मधील मायक्रोचीप तपासण्याचे अधिकार दिले आहेत.
मत मोजणी नंतर सात दिवसांच्या आत ई व्हि एम तपासणी साठी अर्ज दाखल करता येणार आहे.मात्र त्या साठी एका युनिट मागे ४० हजार प्लस GST निधी भरावे लागणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहणारे पराभूत उमेदवारांना यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज मंजूर झाल्या नंतर उमेदवाराचा इंजिनियर व उमेदवार यांचे समक्ष तपासणी केली जाईल. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत गाईडलाईन्स दील्या आहेत.