भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगावराजकीयसामाजिक

बोरखेडा धरण बंदिस्त पाइपलाइनद्वारे भरण्यासाठी प्रयत्नशील- खासदार उन्मेश पाटील यांची ग्वाही !

जळगाव (प्रतिनिधी)। चाळीसगाव तालुक्यात सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होत असताना बोरखेडा परिसरात जलसिंचनात महत्वाची भूमिका बजाविणारा बोरखेडे धरण सातत्याने कोरडे राहत आहे.

येत्या काळात बोरखेडा धरण बंदिस्त पाइपलाइन द्वारा भरण्यासाठी प्रयत्न करणार असून हा परिसर अधिक सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिली आहे. बोरखेडा येथे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या शिफारशीने जिल्हा क्रीडा योजनेच्या माध्यमातून सुमारे आठ लाख रुपये खर्चून बांधलेल्या अद्ययावत व्यायामशाळेचे लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला या प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. कार्यक्रमाला आमदार मंगेश दादा चव्हाण, माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, वाय आर सोनवणे सर, सरपंच सुशिलाबाई आण्णा कांबळे तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला दर्गा परिसरात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट देऊन पिर बाबा दर्ग्याचे दर्शन घेतले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते व्यायामशाळेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अख्खे गावकरी एकत्र आले होते. तर तरुणांनी खासदार उन्मेश दादा पाटील आगे बढो घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तर तरुणांनी फटाक्याच्या दणक्यात लोकार्पण सोहळा साजरा केला.

यावेळी खासदार उन्मेश दादा पुढे म्हणाले की हे गाव सदैव विकासासाठी तत्पर राहिले आहे. गावाच्या विकासासाठी गावकरी पदाधिकारी यांनी भक्कम पाठपुरावा केला आहे. आज तरुण पिढीला आनंद देणाऱ्या व्यायामशाळेचे लोकार्पण झाल्याने तरुण वेळेचा सदुपयोग करून एकत्र येऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी व्यायामशाळा परिसरात ओपन जिम देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असा विश्वास व्यक्त केला. दिनेश बोरसे यांनी गावाचा हिंदू मुस्लिम समाजातील एकतेचे कौतुक करीत हे गाव भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी नेहमी खंबीर उभे राहते याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली. आय.आर. सोनवणे सर यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सरपंच सुशीला आण्णा कांबळे , डॉ.डि.पी.पाटिल, अण्णा कांबळे, ग्रा.प.स.हिरामण पाटिल, सुपडू पाटिल, सैय्यद बशीर, चितामन पाटिल, चुडामण पाटिल, परमेश्वर पाटिल, नाना पूजु कांबळे, रमेश त्रिभुवणे, तुषार सुर्यवंशी, राजू नगराज पाटिल, खडू पाटिल, भिला चीत्ते, सजंय जैन, आधार पाटिल, निबा पाटिल ,एकनाथ पाटिल, भारत कांबळे , प्रल्हाद पाटिल ,सरपंच न्हावे गोरख ठाकुर, आनंदा पचाळ ,वसंत पाटील, देविदास पाटील, संदीप कांबळे, खंडू पाटील, बंटी पाटील आधार पाटील, एकनाथ पाटील, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप पाटील सर प्रास्ताविक सी आर पाटील आभार निकम भाऊसाहेब
यांनी व्यक्त केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!