क्राईमचाळीसगाव

चाळीसगावात अज्ञात इसमा कडून अल्पवयीन मुलाचे अपहरण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चाळीसगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराबाहेर खेळायला जातो असे सांगून बाहेर गेलेल्या मुलाला अज्ञाताने पळविले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख साखीर शेख कासम हे चाळीसगाव शहरातील हूडको कॉलनीत परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान त्यांचा मुलगा अय्यान उर्फ सोनू शेख साखीर (वय-१४) हा सोमवार,४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरच्यांना घराबाहेर खेळायला जातो म्हणून सांगून गेला. मात्र तो घरीच न परतल्यामुळे घरच्यांनी त्याला परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. परंतु अय्यान उर्फ सोनू शेख हा मिळून आला नाही.यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने माझ्या मुलाला फुस लावून पळविले याची खात्री झाल्यानंतर शेख साखीर शेख कासम यांनी लागलीच चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!