भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगाव

आ.मंगेश चव्हाण अटकेच्या निषेदार्थ मेहुणबारे दहिवद गटाच्या वतीने रास्ता रोको…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चाळीसगाव (शुभम देशमुख)। जळगाव येथे आ. मंगेशदादा चव्हाण व शेतकऱ्यांना झालेल्या अटकेचे तीव्र पडसाद चाळीसगाव तालुक्यात उमटत आहेत. गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असताना वीज वितरण कंपनीने तालुक्यातील ७ हजार वीज कनेक्शन कट केल्याने शेतातील उभी पिके जळत आहेत. शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असताना उलट शेतकऱ्यांनाच अटक करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ मेहुनबारे – दहिवद जिल्हा परिषद गटातील भाजपा पदाधिकारी – शेतकऱ्यांच्या वतीने चिंचगव्हाण फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग २११ वर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने करण्यात आली.

यावेळी परिषद सदस्य मोहिनी गायकवाड, अनिल गायकवाड, पंचायत समिती सदस्य पियुष दादा साळुंखे,दहिवद चे सरपंच नवल पवार, भाजपा गणप्रमुख सुनील पवार, अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष आयास पठाण, शुभम साळुंखे, राजू शेख, करमुड येथील भैया पाटील, सुनील जमादार पाटील, खडकी सिम येथील भगवान तात्या व शेतकरी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य साळुंके यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांची जाणीव ठेवत तात्काळ आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांची सुटका करावी, अन्यथा शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदार महाविकास आघाडी सरकार असेल असा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!