वैद्यकीय कंत्राटी अधिकाऱ्याला ६० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रुग्णवाहिकांचे मिळणारे बिलांची पडताळणी करुन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे सही शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर यांचेकडुन पडताळणी करून आणुन देण्याच्या मोबदल्यात ६० हजाराची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांच्या दोन रुग्णवाहीका असुन त्या कोरोना काळात क़ोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव-खेड़यांतुन तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. सदर रुग्ण वाहीकांचे मिळणारे बिलांची पडताळणी करुन त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांचे सही शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर चाळीसगाव यांचे कडुन पडताळणी करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे १०८ रूग्णवाहीका वरील कंत्राटी डॉ. (B.A.M.S.) मुश्ताक मोतेबार सैय्यद यांनी पंचासमक्ष ६० हजार रुपयाची लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः आरोपी यांनी त्यांचे घाटरोड, चाळीसगाव येथील त्यांचे खाजगी सैय्यद क्लीनिक या ठिकाणी स्वीकारली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुश्ताक मोतेबार सैय्यद यांना रंगेहात अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ या पथकाने कारवाई केली.