चॉकलेट देऊन ११ वर्षीय मुलीवर बलात्कार
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। ११ वर्षाच्या मुलीला चॉकलेट खायला देऊन तिला शेजारच्या घरात नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली, याप्रकरणी अफरखान राऊत खान २२, रा. मदिना मशिदीजवळ, चाळीसगाव याला पोलिसांनी अटक केली आहे.
दिनांक १३ रोजी दुपारच्या वेळेस अफसर खान याने ११ वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना तिला चॉकलेट खाण्यास दिले.व नंतर सोबत तिला १०० रुपये ही देऊन शेजारच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला धमकावून तुझ्या वडिलांना मारून टाकीन अशीही धमकी दिली.मुलीने घडलेला प्रकार वडिलांना सांगितल्यावर या घटने बाबत सोमवारी मुलीच्या वडिलांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अफरखान राऊत खान याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.