मोठी कारवाई ; ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा पकडला
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चाळीसगाव तालुक्यात ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा भरलेलं कंटेनर पकडले गेले असून पोलिसांनी गुटख्यासह कंटेनर जप्त केले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ह्या कारवाईने गुटखा व्यवसाईकांमध्ये खडबड उडाली आहे.
- राज्यासह देशभरात राम मंदिरं सजली ; मोठ्या उत्साहात साजरा केला जातोयं श्री राम जन्मोत्सव
- पिकप वाहनाचे टायर फुटल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, ६ जखमी
- पत्नीवर अनैसर्गिक कृत्य, सासऱ्यांसह नणंदोयांचाही बलात्कार
अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातून एका कंटेनरमध्ये २२ मे २०२२ रोजी गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्याने पोलिसांनी ओझर जवळील पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून तपकीरी रंगाचे टाटा कंपनीचे कंटेनर क्रमांक एन.एल. ०१ क्यु ४५३५ ची तपासणी केली असता त्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा HK कंपनीचा गुटखा असे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (तंबाखुजन्य गुटखा) पदार्थाची अवैध वाहतुक करताना उमर मुहम्मद दिनु मुहम्मद, उ.व. ४२. रा. बिशमभरा ता. छाता, ईमरान कुशल, उ.व.३२, रा. शाहजाद पुर, ता. छाता जि. मथुरा, हे मिळून आले.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पो.ना. दीपक प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली असून एपीआय सचिन कापडणीस व सहकारी पुढील तपास करीत आहेत.
.