८० हजाराचा गुटखा पकडला, दोघांना अटक
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दुचाकी गाडीने गुटख्याची वाहतूक करतांना चाळीसगाव ते वाघळी दरम्यानच्या बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथे ८० हजार ७२० रूपये किंमतीचा गुटखा नेत असताना चाळीसगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
चाळीसगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव ते वाघळी रस्त्यावरील बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथून दुचाकीने गुटख्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अन्सारी सईद अहमद ,वय-३४ रा. जाफरनगर, मालेगाव आणि शेख इरफान शेख युनूस रा. सायगाव ता.चाळीसगाव यांच्या कडून ८० हजार ७२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्यांना अटक केली.पोहेकॉ शांतराम सिताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो नि ज्ञानेश्वर जाधव करीत आहेत.