भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगाव

जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यातील खून सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे खुनाची मालिकाच सुरू झाली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चाळीसगाव तालुक्यातील अभोणे गावात दारूच्या नशेत असलेल्या मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात बैल पूजनाची लोखंडी पास डोक्यात घालून खून केला अशी माहिती मिळाली असून ही घटना दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

चाळीसगाव तालुक्यातील अभोणे येथे बैल सणाच्या उत्साह सुरू होता. मोठा भाऊ पिंटू तुकाराम पाटील,वय ३८ वर्ष व लहानभाऊ शिवाजी तुकाराम पाटील,वय ३२ वर्ष , हे घरी बैल पूजनासाठी आले. तितक्यात त्यांच्यामध्ये किरकोळ वाद होऊन वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले. दारापुढे बैल पूजनाची तयारी सुरू असताना हा वाद सुरू होता, जवळच बैल पूजनासाठी लोखंडी काठी ठेवण्यात आली होती, मोठा भाऊ पिंटू तीच काठी घेऊन, लहान भाऊ शिवाजी यांच्या डोक्यावर तीन वार केले, डोक्यावर जोरदार प्रहार झाल्यामुळे पिंटू जागीच गतप्राण झाले.

त्याला तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!