अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास
मृत्युपर्यंत जन्मठेप
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायालयाने नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला.
या बाबत अधिक माहिती अशी की,संदीप सुदाम तिरमली, वय ३६ वर्षे, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव ,याने दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ७.३० ते ८.०० वाजेच्या दरम्यान पिडीता ही तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात खेळत असतांना पिडीता हीस खाऊ देण्याचे आमिष दाखवून तो राहत असलेल्या घरी बोलावले. त्यानंतर पिडीतेला खाऊ घेण्यासाठी दहा रुपयाच्या तीन नोटा देऊन तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्यावर केला. पिडीत मुलगी ही रडत रडत घरी आली असता तिच्या हाताच्या मुठीत तीन दहा रुपयाच्या नोटा रक्ताचे डाग असलेल्या दिसल्या ,सदर पीडित मुलीने सर्व हकीगत घरी सांगितल्याने कुटुंबीयांनी दिनांक ०४ जानेवारी २०२१ रोजी मेहुणबारे पो.स्टे. येथे आरोपीविरुध्द फिर्याद दाखल केली.
सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयत होऊन एकूण ६ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष तपासणी अंमलदार व डॉक्टरांची साक्षी खुप महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरत आरोपी संदीप तिरमली ला दोषी धरून भा.द.वि. कलम ३७६(२) (जे) साठी १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड. भा.द.वि. कलम ३७६ ऐवी साठी आजन्म कारावासाची शिक्षा व रुपये २,०००/- दंड. बा.लै. अ.प्र अधिनियम २०१२ चे कलम ३ साठी ७ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड. बा.लै.अ.प्र अधिनियम २०१२ चे कलम ५ साठी १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड.अशी शिक्षा सुनावली असून या पूर्वीही संदीप तिरमली या आरोपीने
कलम ३७६ च्या गुन्हयामध्ये ७ वर्षांची शिक्षा भोगुन आला असून हा पुन्हा दुसरा गुन्हा केला आहे.