चार हजाराची लाच घेताना सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक जाळ्यात
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जाळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन मधील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक या दोघांना चार हजाराची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली.
मुलींच्या सासरच्या मंडळी कडून त्रास होत होता म्हणून विवाहित मुलीने व तिच्यात माहेरच्या नातेवाईकांनी चाळीसगाव पोलिसस्टेशनला या पूर्वीच तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल झाला होता,त्या साठी तुम्हाला मदत करू त्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली गेली असता चार हजार रुपयांवर तंटा तुटला,तक्रारदाराने या बाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली असता विभागाने सापळा रचून चाळीसगाव शहरातील सिग्नल पाईंटजवळील एका चहाच्या टपरीवर पंचासमक्ष अनिल रामचंद्र अहीरे, वय-५२, सहा.फौजदार, नेमणूक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३, रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव. ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि शैलेश आत्माराम पाटील, वय-३८,पोलीस नाईक, नेम-चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन वर्ग-३, रा.चाळीसगांव. ता.चाळीसगाव जि.जळगांव यांना पंचासमक्ष ४००० /- रुपयेची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत एस.पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, एन.एन.जाधव , पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव.एन.एन.जा6धव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.ना.सुनिल शिरसाठ,पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.