लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी केली असता मुलीच्या वडीलांना ते स्थळ आवडले नसल्याने त्यांनी लग्नास नकार दिल्याने याचा राग येऊन मुलीला पळवून नेल्याची घटना
घडली.
या संदर्भात अधिक महिती आशी की,चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथून तालुक्यातीलच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्ना साठी स्थळ आले,मात्र मुलीच्या वडिलांना हे स्थळ पसंत नसल्याने त्यांनी वारंवार त्या स्थळाला नाकार दिल्याने याचा राग येऊन मागणी करणारा वर व त्याचा मित्र अशा दोघांनी मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिसस्टेशनला दिल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसस्टेशनला जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड, दोन्ही रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.