भांडणाच्या कारणावरून विवाहितेला मारहाण करून विनयभंग : गुन्हा दाखल !
चाळीसगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील एका ४० वर्षीय विवाहितेला लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिलेच्या मुलासोबत एकाचा वाद झाला होता. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिला व तिचे पती घरी असताना गावातील रवींद्र निवृत्ती कुमावत हा लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विवाहितेच्या घरी आला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर शिवीगाळ का करतो असा जाब विचारल्याने त्याला राग आला रागातून कुमावत याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व महिलेचा साडीचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला
यात महिलेच्या गळ्यातील पोट या दरम्यान तुटली असून सदर प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र निवृत्ती कुमावत याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.