अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चाळीसगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला ऋषीकेश सुरेश पावले याने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली .
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शनिवार, दि.२३ एप्रिल रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान आपल्या घरात एकटी असतांना गावातील ऋषीकेश सुरेश पावले याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप पिडीत मुलीच्या वडीलांनी करत पोलिसस्टेशनला तक्रार दाखल केल्याने त्याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संशयित आरोपी ऋषीकेश सुरेश पावले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.