मामाकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चाळीसगावला मामा कडे आलेल्या जामनेर येथील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.
या बाबत अधिक माहिती अशी की,जामनेर तालुक्यातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी चाळीसगाव येथे मामाकडे भेटायला अली असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून
२४ मार्च गुरुवार रोजी सकाळी चार-साडेचार वाजेच्या सुमारास पळवून नेले,या संदर्भात पडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.