चाळीसगाव

धरणात पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा पाण्यांत बुडून मृत्यू !

Monday To Monday NewsNetwork:

चाळीसगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणामध्ये आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या काका-पुतण्याचा पोहतांना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.

आज सकाळी ८ वाजता तालुक्यातील वरखेडे लोंढे येथील धरणावर हिरतसिंग जगतसिंग पवार व पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार राहणार वरखेडे बुद्रुक हे काका-पुतणे पोहण्यासाठी गेले असता पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार हा पाण्यात पोहत असतांना पाण्यातील जाळ्यात अडकला होता. पुतण्या पाण्यातून येत नाही हे लक्षात आल्याने त्याला वाचवण्यासाठी काका हिरतसिंग पवार यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, यात दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरीकांनी धाव घेवून दोघांचे मृतदेह काढत चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मयत घोषीत केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!