ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी पोलिसांकडून उध्वस्त !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव प्रतिनिधी। तालुक्यातील ओझर शिवारातील गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर रविवारी सकाळी पोलिसांनी छापा टाकत गावठी दारूचे कच्चे मालासह एकुण 84 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 4 जणांवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
तालुक्यातील ओझर शिवारात शेतात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर दि 25/04/2021 रोजी पोलीस निरीक्षक श विजयकुमार ठाकूरवाड सपोनि सचिन कापडने, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील,अभिमान पाटील, पंढरीनाथ
पवार, प्रविण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतिष राजपूत, भगवान माळी यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास छापा मारून त्या ठिकाणावरुन 200 लिटर उकळते रसायण, 2625 लिटर कच्चे रसायन, 770 लिटर गावठी दारू असा एकुण 84,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश करण्यात आला याप्रकरणी 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.