बिस्किट पुडा खायला देतो असे आमिष दाखवून चार वर्षीय बालिकेवर अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चाळीसगावातून अत्याचाराची एक बातमी समोर आली आहे. बिस्किट पुडा खायला देतो असे आमिष दाखवून अवघ्या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी पळून जाण्याच्या बेतात असलेल्या या आरोपीला पकडून बेदम चोप देण्यात आला. आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ ४ वर्षीय बालिकेला नेत बालिकेवर अत्याचार करण्यात आला शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आली. त्यानंतर मातेनं आरडाओरड केली.
आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. चाळीसगाव शहर पोलिसांनी संशयित आरोपी सावळाराम भानुदास शिंदे (लोंढे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम 363, 366,(अ) 376(ए बी)व पोस्को कायदा अंतर्गत 4,5 (एम) 6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.