राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोन जण जागीच ठार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चाळीसगाव – कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ आज भिषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. हर्षल संतोष ठाकर,वय-२८ रा. सांगवी ता. चाळीसगाव व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल शहा,वय-२२ रा. धनसनी भांदलगाव, राज्य उत्तराखंड,असे दोघं मयतांची नाव आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१२- वरील चाळीसगाव – कन्नड रोडवरील सदिच्छा हॉटेलजवळ झालेल्या भिषण अपघातात हर्षल संतोष ठाकरे व बोंबेदर कुमार उर्फ बॉबी खिलालाल शहा या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवार रोजी घडली . घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत पंचणामे केले.