भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

‘कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणं बंद करा’, मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यावरुन चंद्रकांतदादांचा ठाकरे सरकारवर हल्ला

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा पत्रक काढून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केलाय. मशिदींवरील भोंगे काढण्याची भूमिका ही बाळासाहेब ठाकरेंची आहे, याची आठवण राज यांनी उद्धव ठाकरेंना करुन दिलीय. दुसरीकडे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारकडून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावरही कारवाई करण्यात आलीय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावं, असा खोचक टोला लगावलाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असं आवाहन पाटील यांनी केलंय. महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही.

सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे.

आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजक निर्माण करणे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते. महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असंही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!