भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

शहरानंतर जिल्ह्याचीही नावं बदलली, औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव

छत्रपती संभाजीनगर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावंही बदललं आहे. आता शहरानंतर जिल्ह्याचं नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याचंही नाव धाराशिव झालं आहे. या पूर्वी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं.राज्य सरकारने काल दि .१५ सप्टेंबर रोजी राजपत्र प्रकाशित करुन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदलली आहे. त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही असं सांगितलं होतं. पडताळणी झाली नसताना तुम्ही नावं कशी बदलली अशी विचारणा हायकोर्टाने केली. त्यामुळे तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं. ही प्रक्रिया पूर्ण करुन आम्ही विचार करु असं सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर सरकारकडून राजपत्र जारी करण्यात आलं. त्यानुसार आता उस्मानाबाद आणि औरंगाबाद या संपूर्ण जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली.

यापूर्वी औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद शहराचं नाव धाराशिव करण्यात आलं होतं. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचं नाव बदललेलं नव्हतं. ते आता राजपत्र जारी करुन बदलण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमी हा बदल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!