वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा… मुलीला विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीला विवस्त्र नाचऊन व्हिडीओ बनवल्याने वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर मधून समोर आली . पीडित मुलीने तिच्या सावत्र बापाचे अनेक कारनामे चव्हाट्यावर आणले आहेत.
आपल्या १४ वर्षीय मुलीवर नराधम बाप हा अत्याचार करत होता. तिला विवस्त्र नाचवून तिचे व्हिडीओ बनवत होता.दररोजच्या होणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्याच क्रूर बापाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दोन वर्षांची लहान असताना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचा अशपाक गफ्फार शेख सोबत दुसरा विवाह झाला. मात्र, अशपाकची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरु केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसंच, तिला विवस्त्र करत तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी कंटाळली होती. अखेर पीडित मुलीने छत्रपती संभाजीनगर
मधील पुंडलिकनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला व त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली.