भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच अखेर खाते वाटप जाहीर, कोणाला कोणतं खातं..वाचा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर झाले असून अपेक्षेप्रमाणे गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिले आहे. तर, अर्थ व वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना नगरविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली असून गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती देण्यात आली आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. अखेर आज सर्व मत्र्यांना त्यांची खाती मिळाली आहेत.

राज्यातील संपूर्ण खातेवाटपाची यादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क

मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे –   महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील –  जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील –  पाणीपुरवठा व स्वच्छता
7.गणेश नाईक –  वन
8.दादाजी भुसे – वशालेय शिक्षण
9.संजय राठोड – मृदा व जलसंधारण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, राजशिष्टाचार
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – टेक्स्टाईल
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

  1. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  2. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  3. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  4. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
  5. योगेश कदम – गृहराज्य शहर
  6. पंकज भोयर – गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!