भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा: आषाढी एकादशीच्या अनुषंगाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे रवाना होत आहेत. आता ह्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.”

आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने यावर्षी पंढरपूरात मोठ्या प्रमाणा गर्दी वाढेल. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येत आहे. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देश द्या. त्या वाहनांना स्टिकर्स देण्यात यावेत. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे या वाहनांची नोंद करून या वाहनांना टोल माफ करण्यात यावी. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे निर्देश मुख्यमंंत्र्यांनी दिले आहेत. खड्डे लक्षपूर्वक भरा, खड्ड्यांमुळे अपघात होऊन कुणी जखमी होऊ नये, याची प्रामुख्याने दक्षता घ्या, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!