भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली असून त्या योजने द्वारे २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबविण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरितीने शक्य व्हावं म्हणून नियमांत सातत्याने शिथीलता आणली जात आहे. आज मंगळवार दि.२३ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेत पुन्हा ६ बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

हे आहेत बदल

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.

२. एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे.

३. ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे.

४. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.

५. नव विवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.

६. ओटीपीचा कालावधी १० मिनिटांचा करण्यात यावा. विशेष बाब म्हणजे या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय आजच्या बैठकीत झाला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!