भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या बालकाचा तलावात बुडून मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जामनेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा: तालुक्यातील मांडवे बु. येथे म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा तलावात पाय घसरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.

तालुक्यातील अतुल अमोल विसावे-कोळी हा गावातील शिवारात म्हशी चारण्यासाठी गेला होता. म्हशी चारून झाल्यावर तो मांडवे गावाच्या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या माती बंदधारावर म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला असता तेथे असलेल्या चिखलात पाय घसरल्याने तो खोल पाण्यात जाऊन पडला. मात्र, तो एकटा असल्याने आजूबाजूला देखील कोणीच नसल्याने त्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना ही घटना कळताच त्याला तलावातून बाहेर काढून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!