भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

शेठ ला.ना.सा.विद्यालयात अवतरले बाल शास्त्रज्ञ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे कोषाध्यक्ष तथा भगीरथ विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर राजे ,शाळेचे सेवानिवृत्त ज्येष्ठ विज्ञान शिक्षक सुरेश कुलकर्णी ,शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय भारुळे, जेष्ठ पर्यवेक्षक श्री.प्रशांत जगताप, संजय वानखेडे ,जेष्ठ शिक्षिका सौ. आशा कुलकर्णी, सुभाष पाटील, विज्ञान विषय प्रमुख आनंद पाटील, आनंद चौधरी, सोमनाथ महाजन , सौ.पद्मजा जोशी,यांचे हस्ते देवी सरस्वती,नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ डॉ.सी. व्हि.रमण, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना माल्ल्यार्पण करण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील विद्यार्थांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.बेंजामिन फ्रँकलिन, डॉ. होमी भाभा, डॉ.जगदीशचंद्र बोस, डॉ. कलाम , डॉ.चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले.तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत घोषवाक्य सांगितले.

या प्रसंगी जेष्ठ शिक्षक आनंद चौधरी व विद्यार्थांनी विज्ञान गीत सादर केले तर पांडुरंग सोनवणे यांनी तबल्यावर साथ दिली. तसेच या कार्यक्रमात सहभागी विद्या थी शिंपी, विज्ञानवर आधारित नाटिका , प्रथमोपचार वर आधारीत नाटिका,समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या वेळेस शाळेतील पीयूष नेवे, ध्रुव वाघ, समर्थ, सार्थक, साई पाटील, मुस्तफा पिंजारी, मयूर शिंपी सह ३० विद्यार्थ्यांनी विज्ञान पाठ्यांश घटकावर आधारित छोटे छोटे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखविले व त्यामागील वैज्ञानिक तत्व स्पष्ट केले. केशव मराठे याने नवीन शोधांची माहिती सांगितली.

सचिन पंडित याने न्यूटनच्या नियमांची माहिती सांगितली. समीर पिंजारी, केतन कपाटे, निकुंज शर्मा यांनी विविध मनोरंजनात्मक प्रयोग सादर केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी तथा बाल विज्ञान परिषदेचे सल्लागार किशोर राजे यांनी विद्यार्थांनी रोजच्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्याचे आवाहन केले तर जेष्ठ विज्ञान शिक्षक सुरेश कुलकर्णी यांनी गोष्ट सांगून विज्ञान महत्व स्पष्ट केले.शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय भारुळे, पर्यवेक्षक प्रशांत जगताप, संजय वानखेडे यांनी या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विज्ञानाचा डोळसपणे वापर करण्याचे आवाहन केले.

तसेच अंधश्रद्धा निर्मूलन या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू पाटील, आनंद पाटील, यांनी सूत्रसंचालन जेष्ठ विज्ञान शिक्षिका सौ.जयश्री नेहेते , सौ.यामिनी चौधरी, यांनी तर आभार प्रदर्शन सौ. रुपाली महाजन, सौ.जागृती मोरानकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग सोनवणे. उमेश ढाकणे, उल्हास ठाकरे,सौ. यामिनी चौधरी, किशोर माळी, श्रीमती नीलिमा सपकाळे , संगणक विभाग तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यांनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!