वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या विजेच्या तारांच्या धक्क्याने बालकांचा मृत्यू !
सावदा, ता. रावेर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील बर्याच परिसराला काल झालेल्या वादळी वार्यासह पाऊसाने जोरदार तडाखा दिला. यात खिरोदा येथील वादळी वार्यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने गावांतील एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
- यावल तालुक्यात अमोल जावळे याना उस्फुर्त प्रतिसाद, सर्वसामान्यांकडून महायुती सरकारच्या निर्णयांचे कौतुक
- US Election 2024 Live Updates : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय
- ब्रेकिंग : विनोद सोनवणे गोळीबार प्रकरणात तीन संशयित ताब्यात; दोन फरार !
रावेर तालुक्यातील धामोळी परिसर,रेम्भोटा परिसर, रोझोदा परिसर, खिरोदा अशा तालुकाभरातील बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली मात्र, अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडाले असून वृक्ष उन्मळून पडल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्या अफसर अजित तडवी याच ५ वर्षाच्या चिमुकल्यांचा काल वादळात पडलेल्या विजेच्या तारांचा धक्क्याने अपघाती मृत्यू झाला. यामुळे नागरिकांकडून महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणार्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सावदा पोलीसात नोंद करण्यात आली आहे.