चिनवलात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवकास कोरोनाची बाधा !
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी): काल रात्री उशिरा आलेल्या तपासणी अहवालात कोरोना काळात गावात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गावातील नागरिकांना कोरोना बद्दल जनजागृती निर्मूलनासाठी आरोग्य विषयक सूचना व सर्व्हेक्षण करून कोरोना रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करण्याचे अहोरात्र कार्य करणारे चिनावल प्रा.आ.केद्राचे एक ५२ वर्षीय आरोग्य सेवक कोरोना बाधित आले आहे.
सदर आरोग्य सेवक सलग ४ महिन्यांपासून गावात वेद्यकिय अधिकारी , कर्मचारी , ग्रामपंचायत प्रशासन , महसूल प्रशासन सोबत कोरोना निर्मूलन व कोरोना साखळी तोडणे कामी कार्यरत होते. मात्र त्यांनी दि.२८ रोजी फैजपूर कोविड सेंटर वर स्वताहून टेस्ट केल्याने त्यात ते बाधित आले आहेगावांतील एकूण बधितांची संख्या ४१ झाली असून त्यात ३ मयत आहेत तर १ उपचार घेत आहे व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.