“माझी वसुंधरा अभियानात” “चिनावल”ग्रामपंचायत राज्यातून तिसरी
Monday To Monday NewsNetwork।
चिनावल ,ता.रावेर(प्रतिनिधी)। जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने सन २०२०,२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात राज्यातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून चिनावल ग्रामपंचायत ने तृतीय क्रमांक मिळवत यश मिळवले .सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात राज्यातील 291 ग्रामपंचायतीची निवड झाली होती. या गटात जिल्ह्यातील चिनावल, (ता. रावेर) ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला. हा पुरस्कार सरपंच सौ. भावना योगेश बोरोले आणि ग्रामसेवक संतोष सपकाळ यांनी स्वीकारला
आज दिनांक पाच जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ राज्यमंत्री संजय बनसोडे विभागाच्या आयुक्त मनिषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझी वसुंधरा अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानाचा पुरस्कार देऊन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला या अभियानात जळगाव जिल्ह्यातून चिनावल तालुका रावेर या ग्रामपंचायतीने शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व त्या निकषांचे पालन करत गावात प्रदूषण मुक्त गाव, प्लास्टिक मुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत प्रकल्प, सोलर ऊर्जा स्त्रोत प्रकल्प, ई-लर्निंग शाळा व कोरोना काळ असूनही मोहीम चिनावल ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.भावना योगेश बोरोले उपसरपंच , ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे व सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्ग रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल व सर्व अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाने राज्यभरातून ग्रामपंचायत विभागातील 291 ग्रामपंचायतीं पैकी चिनावल ग्रामपंचायतींची यातून निवड करण्यात आली.