चिनावल येथे शेतमालाचे नुकसान सुरूच, लाखोंरुपयांचे केळीचे घड कापून फेकले, नुकसानीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी भयभीत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चिनावल,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील केळी साठी प्रसिद्ध असलेल्या चिनावल येथे उभ्या शेतातील शेतमाल चोरी करण्यास अटकाव केल्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली तसेच नुकसानीची ताजी घटना असतानाच त्याच प्रमाणे चिनावल सह परिसरात मोठ्या प्रमाणावर शेतीमालाच्या चोऱ्या व नुकसान होत असल्याने रोझोदा येथे परिसरातील शेतकऱ्यांची एक बैठक घेण्यात आली.
परिसरातील शेतकऱ्यांची रोझोदा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत प्रशासनाबाबत मोठी नाराजी व्यक्त होत असतांना आज 23 बुधवार रोजी पुन्हा चिनावल येथे शेतकऱ्याचे एक हजार केळीचे घड कापून फेकून नुकसान केले गेले या मध्ये सदर शेतकऱ्याचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी नुकसान ग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे यांचे फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध चोरी व नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शेतकऱ्यांच्या शेती मालाचे लाखो रुपयांच्या शेती मालाचे नुकसान होत असल्याने तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबतच नसल्याने शेतकरी भयभीत होऊन संरक्षणाची मागणी करू लागले आहे.
चिनावल येथील कमलाकर भारंबे, निखिल भारंबे, अरविंद भास्कर महाजन, होमकांत महाजन यांच्या शेतातील केळीच्या बागेतील सुमारे 4 लाखाच्या वर किमतीचे एकहजार केळीचे घड कापून नुकसान केले आहे.
दरम्यान मागील चार-पाच दिवसांपासून चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाची मुद्दाहून नासधूस करून कृषी सामग्री चोरी करून आर्थिक नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचा पोलिस प्रशासनावर रोष असून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील केल्या परंतु पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत ,तसेच चोरी व नुकसान करणाऱ्या आरोपीवर कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप देखील यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी संबंधित चोरट्यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्यांच्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती घेऊन कारवाई करावी अशी देखील मागणी या वेळी करण्यात आली, वेळीच या प्रकरणाला आळा न घातल्यास शेतकऱ्यांत उद्रेक होऊ शकतो , पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी देखील शेतकरी करू लागले आहे.
केळी उत्पादक शेतकरी आधीच मोठ्या संकटांना तोंड देत असताना रोज नव-नवीन संकट त्याच्या समोर उभे राहत आहे,सदर प्रकाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून शेतकऱ्यांना अभय न दिल्यास लवकरच पोलीस स्टेशन, प्रांत कार्यालयात बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा चर्चेतून देण्यात आला. दरम्यान दंगा नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या डीवायएसपी विवेक लावंड सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड राजेंद्र पवार यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला होता. यावेळी चिनावल गावातील श्रीकांत सरोदे, गोपाल नेमाडे, पोलीस पाटील निलेश नेमाडे,तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले,अन्यायग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे, तुषार महाजन, सागर भारंबे, ठकसेन पाटील, मनोज पालक, पंकज नारखेडे,गोपाळ पाटील, विनायक महाजन,कल्पेश नेमाडे, चंद्रकांत भंगाळे,बंसी गारसे,राहुल बोंडे, राजू पाटील, कुंदन पाटील,सुनील बोंडे, राहुल नारखेडे,संदीप महाजन, दिनेश महाजन, सूनील गाजरे, भास्कर सरोदे, दामोदर महाजन,किशोर महाजन, विलास महाजन, स्वप्नील पाटील, चंद्रकांत कापसे कमलाकर पाटील ,पंकज पाटील या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते,शेतमाल चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास असून रात्री अपरात्री शेतकऱ्यांवर हल्ले होऊन जीविताला ही धोका असल्याने शेती करावी की नाही असा एक प्रश्न आमच्यासमोर उभा टाकला असल्याने तात्काळ त्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे