माझी वसुंधरा अभियान:चिनावल ग्रा.प.ने राज्यात तिसरा क्रमांक मिळवल्याने रावेर प.स.तर्फे सत्कार
Monday To Monday NewsNetwork।
चिनावल ता.रावेर (प्रतिनिधी)। माझी वसुंधरा अभियानात गुणानुक्रमा नुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था चिनावल येथील सरपंच भावना योगेश बोरोले, उपसरपंच परेश महाजन,आणि ग्रामविस्तार अधिकारी संतोष सपकाळे यांनी उत्कृस्तरीत्या सादरीकरण केले होते चिनावल ग्रामपंचायतीला शासनाकडून ५० लाखाचे बक्षीस जाहीर झाले.
माझी वसुंधरा अभियान मध्ये महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत विभागात एकूण 293 ग्रामपंचायतीत उत्कृष्टपणे काम करून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर बक्षीस मिळवल्याने चिनावल सरपंच सौ भावना बोरोले उपसरपंच परेश महाजन तसेच ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे याचा पंचायत समितीच्या सभापती सौ कविता कोळी व गटविकास अधिकारी सौ दिपाली कोतवाल यांनी सत्कार केला व भविष्यात अजून चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्या मध्ये तिसरा क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाल्याने प स च्या दि १५/७/२०२१च्या मासिक सभेत सत्कार करण्यात आला.